पुणे, दि. ११ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर :
उत्सव साजरा करताना डीजे सोबत थिरकण्यासाठी बीम लाईटचा वापर करणाऱ्या मंडळावर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हडपसर परिसरात दहीहंडी साजरा करताना शार्पी लाईट, बिम लाईट लावणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हडपसर पोलिसांकडून मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Pune Beam Light Cases सदर कारवाई पोलीस उपायुक्त-५ आर.राजा, हडपसर पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दहीहंडी 2024 च्या अनुषंगाने लेझर लाईट, बिम लाईट साउंडचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
1) गु. रजि. नं – 1364/2024 भा. न्या. सं. 223,3(5) प्रमाणे
- आरोपी – प्रभाकर पवार
2) गु . रजि. नं – 1367/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
- आरोपी – हर्षद भालसिंग 35, 2) राकेश चौधरी 32
3) गु . रजि. नं – 1368/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
- आरोपी – गणेश यादव- 30, रा. फुरसुंगी,अजिंक्य ढमाळ- 33 रा. भेकराईनगर
4) गु . रजि. नं – 1369/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
- आरोपी – मनोज जगताप 38, रा धमाळवाडी, महादेव खापणे 33 रा. कोल्हापूर
5) गु . रजि. नं – 1371/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
- आरोपी – रोशन पाटील रा ससाणेनगर, आशिष चव्हाण रा. हडपसर
6) गु . रजि. नं – 1372/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
- आरोपी अनिकेत जगताप रा. ससाणेनगर, मोहंमद आशिक रा. केरळ
दि. 10/09/24 रोजी हडपसर पोलीस स्टेशनकडील लेजर लाईटचे 06 गुन्ह्यातील लेझर, बिम लाईट, व स्पीकरचे मशीन असा मुद्देमाल कायदेशीर पद्धतीने जप्त करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना BNSS 135 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली.