Uncategorized
Trending

Pravin Darekar On Sanjay Raut : भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ‘चिंगम’ अशी उपमा देत टीका

Pravin Darekar On Sanjay Raut : स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या चिंगम संजयराव त्यांनी सिंघम देवेंद्र फडवणीस यांची जनता करू नका ; आमदार प्रवीण दरेकर

मुंबई :- ‘धर्मवीर-2’ चित्रपटाच्या प्रोमो च्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर -3’ मी देणार असल्याचे पत्रकारांना गमतीशीर म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. त्यांनी स्वयंघोषित सिंघम धर्मवीर-3 लिहिणार आहेत असे टीका मुखपत्रातून करण्यात आली त्यावर प्रतिक्रिया देत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी संजय राऊत Sanjay Raut यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांना ‘चिंगम’चे उपमा देत समाचार घेतला आहे. प्रवीण दरेकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहिली आहे.

आमदार प्रवीण दरेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की,महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे.

ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो.

देवेंद्र फडणवीस जी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की,पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.

देवेंद्रजी फडणवीस जी हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका‘च्या सर्टिफिकेटची गरज नाही. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांचा प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत ठाकरे गटाच्या मुखपत्राद्वारे म्हणाले होते, महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपत आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरप्रकरणी शिंदे व फडणीस यांच्यात श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचा दावा केला होता. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात सिंघम कोण? यावरून भांडणे सुरू आहेत. एका सरकारमधील 2 नेते चकमकीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ करत आहेत. यावरून यामागे किती राजकारण शिजत आहे हे स्पष्ट होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 100 हून अधिक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. अनेक गुन्हे घडले. तिथे किती लोकांचा एन्काऊंटर करण्यात आला? मुंबईच्या नालासोपऱ्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली. सिंघम फडणवीस, सिंघम एकनाथ शिंदे त्याचा एन्काउंटर करणार का? एकच एन्काउंटर का?, असे ते म्हणाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0