India vs Bangladesh Highlights : भारत-बांगलादेश संघ हॉटेलमध्ये परतले, पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होऊ शकला नाही
India vs Bangladesh Highlights : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीतील दुसरा सामना सुरू होऊ शकला नाही. या कारणास्तव दोन्ही संघ हॉटेलमध्ये परतले.
BCCI :- भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे. मात्र पावसामुळे हा सामना आधी थांबवण्यात आला आणि शनिवारी दुसऱ्या दिवशी सुरू होऊ शकला नाही. कानपूरमध्ये पावसामुळे ग्रीनपार्क स्टेडियमची खेळपट्टी आणि मैदान झाकले गेले. मुसळधार पावसामुळे भारत आणि बांगलादेशचे संघ हॉटेलमध्ये परतले.India vs Bangladesh Second Test Day 2 Highlights
बांगलादेशने पहिल्या डावात 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये पावसाने दिवसाची सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही.या कारणामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हॉटेलमध्ये परतला. टीम इंडियासोबत बांगलादेशी खेळाडूही हॉटेलकडे रवाना झाले. India vs Bangladesh Second Test Day 2 Highlights
बांगलादेशच्या पहिल्या डावात झाकीर हसन आणि शादमान इस्लाम सलामीला आले. झाकीर शून्यावर बाद झाला. तर शादमान 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोमिनुल हक 40 धावा करून नाबाद राहिला. त्याने 81 चेंडूंचा सामना करत 7 चौकार मारले. नझमुल हुसेन शांतो 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर मुशफिकुर रहीम 6 धावा करून नाबाद राहिला.