प्रतिक्षा जगण्याची काव्यसंग्रहाचे प्रकाशन वजिजाऊ संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी होणार संपन्न
कळंब,(प्रतिनिधी) – येथील कवी परमेश्वर पालकर लिखित “प्रतिक्षा जगण्याची” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व जिजाऊ संस्थेचे पुरस्कार वितरण येत्या रविवारी शहरातील वेद शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, जेष्ठ पत्रकार धनंजय लांबे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संतोष राऊत, उद्योजक विलास पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तर प्रमुख उपस्थिती पत्रकार भिमाशंकर वाघमारे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के पी पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र स्वामी, महाराष्ट्र राज्य पुस्तक महामंडळाचे सदस्य सत्येंदर राऊत पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून राजमाता जिजाऊ संस्थेचे पुरस्कार वितरण व कवितासंग्रहाचे प्रकाशन हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे कवी व संस्थेचे सचिव परमेश्वर पालकर यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
यांचा होणार सन्मान
राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सौ महानंदा लक्ष्मणराव जाधवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्कार डॉ सरोजिनी संतोष राऊत, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जिवनगौरव पुरस्कार दिलीपराव गंभीरे, राजर्षि शाहू महाराज शिक्षणरत्न पुरस्कार महादेव खराटे, कळंब तालुका पत्रकार संघाचा कै राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार अप्पासाहेब काळे,विज्ञान अध्यापक मंडळाचा भारतरत्न डॉ सी व्ही रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार लोकरे रमेश कोंडीबा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे.