मुंबई

Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल….

Prasad Lad नटरंग संजय राऊतला महाराष्ट्रातील जनताच त्याची जागा दाखवेल

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. एकेरी शब्दांत राऊत यांच्यावर टीका करत असताना लाड यांची जीभ घसरली. नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल असा घणाघात लाड यांनी केला आहे.

मोदी देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान यावेळी लाड यांनी राऊतांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातंय. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय”, असे लाड म्हणाले. Prasad Lad

जनता तुला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाही तसेच संजय राऊत यांना उद्देशून ‘अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,’ असं प्रसाद लाड म्हणाले. तसेच संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केले, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला सांगतो तुला मी सोडणार नाही, असा एकेरी उल्लेख करत इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला. Prasad Lad

काय म्हणाले होते संजय राऊत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दौरा 25 कोटींचा असतो. ते सरकारी पैशांतून भाजपचा प्रचार करत आहे. हाच मोठा भ्रष्टाचार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणीही पंतप्रधान नसतो. मात्र तरीही मोदी सरकारी पैशातून दौरा करत आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी मोदी यांची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी तुलना केली आहे. मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी कला होता. Prasad Lad

तसेच राऊत म्हणाले, “एका सभेत मोदी म्हणाले की आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मात्र त्याच सभेत त्यांच्या आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी 5 भ्रष्टाचारी लोकांचा प्रवेश होते. हे सर्व लोक अट्टल भ्रष्टाचार असतात. मोदी या भ्रष्ट लोकांचे काय करणार आहेत. मोदी हा सर्वांत मोठा विनोद रोजच करतात. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी आमचं मनोरंजन करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत”, असे राऊत म्हणाले. Prasad Lad

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0