मुंबई

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक आयोगाला पत्र

•प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे की, तुम्ही मतदान केलेल्या मतदानाचे फॉर्म 17C रेकॉर्ड…

मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत झालेल्या पाच निवडणुकीच्या टप्प्यातील पहिल्या तीन टप्प्यातील मतदानानंतर जाहीर केलेल्या आकडेवारी मध्ये अनेक तफावत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भातील याची काही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न उपस्थित केले आहे मुंबईत बरेच मतदान केंद्रावर मतदान संत गतीने केले होत असल्याच्या आरोप सर्व राजकीय मंडळींनी केला आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या पत्रात म्हणतात की,
प्रिय,
Election Commission of India

तुम्ही मतदान केलेल्या मतदानाचे फॉर्म 17C रेकॉर्ड का अपलोड करत नाही आहात?नियम 49S अंतर्गत, प्रत्येक पीठासीन अधिकाऱ्याने मतदान पूर्ण झाल्यानंतर उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलिंग एजंटला, त्याने/तिने फॉर्म 17C मध्ये तयार केलेल्या मतांच्या खात्याची खरी साक्षांकित प्रत देणे आवश्यक नाही का? पीठासीन अधिकाऱ्याने खात्याच्या प्रती प्रत्येक पोलिंग एजंटला त्याने/तिने न मागता देणे आवश्यक नाही का? माझ्याकडे प्रत्येक बूथवर झालेल्या एकूण मतांच्या प्रती आहेत. तुम्ही अन्यायकारक भूमिका बजावत असल्याने मी आणि अकोल्यातील माझे सहकारी लवकरच मतांची आकडेवारी अपलोड करणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पुन्हा एकदा नव्याने राजकीय चर्चा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0