क्राईम न्यूजपुणे
Trending

Porsche Car Accident | पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार टिंगरे यांची चौकशी : पोलीस आयुक्तांचा खुलासा

पुणे, दि. ७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Porsche Car Accident |

कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे MLA Sunil Tingare यांची चौकशी करण्यात आल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Ameteesh Kumar यांनी केला. गणेश उत्सव निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी माहिती दिली.

कल्याणी नगर येथे पोर्श कार अपघात झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा पोलीस ठाण्याला भेट दिली होती.

बिल्डर विशाल अगरवाल यांच्या मुलाला काहींनी मदत केली होती. पोलीस आयुक्तांनी अपघातातील आरोपीना मदत करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग निश्चित करून त्यांना गुन्ह्यात आरोपी केले होते.

पोलिसांच्या चौकशीत आमदार टिंगरे यांचा सहभाग आढळून आला नसल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांनी यावेळी केला.

पोर्श कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात असून परिस्थितीजन्य तांत्रिक पुरावे कोर्टात दाखल केल्याने आरोपीना अद्याप जमीन मिळाला नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
06:04