देश-विदेश

Pooja Khedkar News : पूजा खेडकरच्या वकिलाने जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सांगितले. यूपीएससीने केलेले आरोप खोटे आहेत.

Pooja Khedkar Latest News : IAS पूजा खेडकर यांनी कोर्टात सांगितले की, ‘मी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे…’, जामीनावरील निर्णय राखून ठेवला आहे.

ANI :- पटियाला हाऊस कोर्टाने प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी पूजा खेडकर Pooja Khedkar यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. पटियाला हाऊस कोर्ट उद्या दुपारी 4 वाजता निकाल देणार आहे. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या जामीनाला विरोध करत पूजाला जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होईल, त्यामुळे पूजाला जामीन देऊ नये, असे सांगितले.

आज कनिष्ठ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरच्या वकील बीना माधवन यांनी सांगितले की, मला अटकेचा धोका आहे. या प्रकरणी यूपीएससीने बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. यूपीएससीचा आरोप खोटा आहे.माधवन यांनी खेडकर यांचे अपंगत्व प्रमाणपत्र नोंदवले. ते 8 डॉक्टरांनी तयार केल्याचे त्यांनी सांगितले. हे एम्सचे बोर्ड आहे. अपंगत्वाची टक्केवारी 47% आहे.

पूजा खेडकर कोर्टात आपल्या युक्तिकवादात म्हणाल्या की, माझ्यावर माहिती लपवणे व खोटी माहिती देणे हा आरोप करता येईल. पण या प्रकरणात माझी कोणतीही बाजू ऐकली गेली नाही. मला नोटीस मिळाली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल झाला. त्यांना मला कोठडीत घेऊन कोणती चौकशी करायची आहे? माझ्या कस्टोडिअल चौकशीची गरजच काय आहे? माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि मीडिया ट्रायल सुरू झाली. मी मीडियात गेले नाही. मी कोर्टात आले, कारण आम्हाला न्यायालयावर विश्वास होता. मी लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून माझ्याविरोधात हे षडयंत्र रचण्यात आले.

माधवन न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हणाले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकारपरिषद घेतली जात आहे. याऊलट पूजा खेडकर केव्हाच माध्यमांना सामोऱ्या गेल्या नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. कारण पूजा यांनी या सुहास दिवसेंविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यांनी पूजा यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले होते. पण पूजा यांनी त्याला नकार दिला. यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले.वकील माधवन हे पूजा खेडकर यांच्यातर्फे भक्कम युक्तिवाद करताना म्हणाले की, पूजा खेडकर यांच्याविरोधात सध्या गुन्हा दाखल झाला आहे. आता त्यांना त्यांची पोलिस कोठडी हवी आहे. पण त्यांनी काय केले? सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना एवढी तत्परता का दाखवली? त्यांना त्यांच्या बचावाची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे

सद्यस्थितीत माझ्यावर फौजदारी खटला दाखल झाल्यामुळे मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल, असेही पूजा खेडकर यांनी आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0