महाराष्ट्र

PM Narendra Modi Maharashtra Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर महाराष्ट्र पिंजणार, नाशिक,दिंडोरी,कल्याण,मुंबई नरेंद्र मोदी यांचा मेगा प्लॅन

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे मुंबईचा एलबीएस मार्ग दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election मतदानापूर्वी प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi Nashik Visit नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण येथे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या करिता प्रचार सभा असणार आहे. तर महाविकास आघाडीही नाशिकमध्ये रोड शो आणि सभा घेत जोरदार प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नाशिकमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील निवडणूक रंगतदार होणार आहे. PM Narendra Modi Maharashtra Visit Live Update

या दौऱ्यांतर्गत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कांदा बाजारात सभा होईल. त्याच दिवशी शरद पवार दिंडोरी आणि नाशिकमध्येही सभा घेणार आहेत. तर नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.

लोकसभेच्या या निवडणुकीदरम्यान, 20 मे रोजी राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे आणि दिंडोरी मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. राजकीयदृष्ट्या नाशिक, धुळे आणि दिंडोरी महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. यामुळे या तीन लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. PM Narendra Modi Maharashtra Visit Live Update

मोदींच्या मुंबईतील रोड शोमुळे मुंबईचा एलबीएस मार्ग दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, मेघराज जंक्शन ते माहुल घाटकोपर रोडवरील आरबी कदम जंक्शनपर्यंत उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन्ही वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 रोजी संपूर्ण एलबीएस मार्गावर आणि एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग लागू केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे रोड शो घेणार आहेत. संध्याकाळी साडे सहा वाजता मोदींचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होईल आणि 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर ते घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे संपेल. PM Narendra Modi Maharashtra Visit Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0