मुंबई

PM Narendra Modi : महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार….

PM Narendra Modi यांच्या त्या वक्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून टीकास्त्र

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे. या आत्मा स्वतःचं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात अशी टीका मोदींनी केली होती. महाराष्ट्रात येऊन मोदींना विठ्ठलाचे दर्शन घेण्याऐवजी अस्थिर आत्मे दिसू लागलेत असा पलटवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.यावर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे
संत एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या दोन ओळी लिहीत आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचे लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनीही केले मोदींवर टीका

पुढे रोहित पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. “4 जूननंतर भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान, याप्रकरणी रोहित पवारांबरोबरच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ असा टोमणा मारला आहे. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमकं मोदींना म्हणायचे तरी काय होते?” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

महाराष्ट्र अशाच एका अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय. 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेकडे ओढला गेला. यानंतर अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. हा आत्मा केवळ विरोधकांचा नव्हे, तर आपल्या पक्षालाही अस्थिर करतो. आता कुटुंबातही असेच करत आहे. 1995 मध्ये राज्यातील शिवसेना- भाजपच्या सरकारलाही या आत्म्याने अस्थिर करण्याचे काम केले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा इतका मोठा अपमान केला, जे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. आज तर हा आत्मा देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करत आहे. त्यामुळे अशा भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवा”, असे आवाहन मोदींनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0