PM Modi Road Show in Mumbai : 15 मे ला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “रोड शो”,पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, 37 ठिकाणी दोन पार्किंग
PM Modi Road Show in Mumbai देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 15 मे रोजी मुंबईचा ईशान्य मुंबईत रोड शो होणार आहे, ईशान्य मुंबईचा घाटकोपरच्या एलबीएस मार्गात पोलिसांनी केले बद्दल
मुंबई :- लोकसभेच्या एकूण सहा जागा असून तेथे विजय मिळवण्यासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला आहे. मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयार केली आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यासाठी ते लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे. 15 मे रोजी मोदींचा ईशान्य मुंबई रोड शो होणार आहे.
पोलीस उप आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे निर्देश काढले आहे .
1.वाहतूकीकरीता पूर्णपणे बंद करण्यात येणारे मार्ग.एल.वी.एस. मार्गावरील गांधी नगर जक्शन ते नौपाडा जंक्शन दरम्यान तसेच माहुल-घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आ.बी. कदम जंक्शन पर्यंत उत्तर व दक्षिण वाहीनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता 2 ते 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.
2.आवश्यकतेनुसार वाहतूकीकरीता बंद करण्यात येणारे मार्ग.
1.अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहीनीवरील वाहतूक.
2.हिरानंदानी कैलास कॅम्लेक्स येथुन गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणारी वाहतूक.
3.गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो स्थानक (प) येथुन सर्वोदया जंक्शनकडे येणारी वाहतूक.
पर्यायी मार्ग
1.पूर्व द्रुतगती महामार्ग,
2.पश्चिम द्रुतगती महामार्ग,
3.अंधेरी-कुर्ला रोड
4.साकी विहार रोड,
5.एम.आय.डी.सी. सेंट्रल रोड, 6. सांताक्रुज चेंबुर लिंक रोड
7.सायन-बांद्रा लिंक रोड,
8.जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
नागरिकांना व प्रवाशांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी वरील पर्यायी मार्गाचा वापर करून योग्य ते नियोजन करावे.
नो पार्किंग” झोन करण्यात आलेले मार्ग
१ सुर्यानगर जंक्शन ते पार्कसाईट पोलीस ठाणे पर्यत, ए.बी. होळकर मार्ग, विक्रोळी (प), मुंबई
२ विक्रोळी स्टेशन जंक्शन ते विक्रोळी स्टेशनपर्यंत, विक्रोळी स्टेशन रोड, विक्रोळी (प), मुंबई
३ गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन ते इमाम अहमद रजा चौक, विर सावरकर मार्ग, विक्रोळी (प), मुंबई
४ विक्रोळी अग्नीशमन केंद्र जंक्शन ते आर्शिवाद ट्रेनींग सेन्टर, निवळेकर मार्ग, विक्रोळी (प), मुंबई
५ आर सिटी मॉल जंक्शन ते अमृतनगर जंक्शन, दत्ताजी साळवी मार्ग, विक्रोळी (प), मुंबई
६ गावदेवी रोड, घाटकोपर (प), मुंबई
७ श्रेयस सिनेमा रोड, घाटकोपर (प), मुंबई
८ भाजी गल्ली, साईनाथ नगर रोड, घाटकोपर (प), मुंबई
९ गंगावाडी रोड, घाटकोपर (प), मुंबई
१० नित्यांनद नगर रोड, घाटकोपर (प), मुंबई
११ ध्रुवराज सिंग माग, घाटकोपर (प), मुंबई
१२ सर्वोदय जंक्शन, घाटकोपर (प), मुंबई
१३ आर वि कदम मार्ग जंक्शन, घाटकोपर (प), मुंबई
१४ खोत गल्ली, घाटकोपर (प), मुंबई
१५ गोपाळ लेन, घाटकोपर (प), मुंबई
१६ सॅनेटोरीयम लेन, घाटकोपर (प), मुंबई
१७ श्रध्दानंद रोड स्टेशन रोड (सेन्ट्रल स्टोर), घाटकोपर (प), मुंबई
१८ नवरोजी लेन, घाटकोपर (प), मुंबई.
१९ हवेली ब्रिज जंक्शन
२० श्री जिराबाई पार्श्वनाथ चौक
२१ देरासार लेन
२२ गायत्री धाम गल्ली
२३ जोशी गल्ली
२४ रामजीआशर गल्ली
२५ पारसमनी गल्ली
२६ वल्लभबाग लेन २७ भावेश्वर लेन
२८ आर.वी. मेहता रोड
२९ ९० फुट रोड
३० पेस्तम सागर रोड ६
३१ पेरतम सागर रोड ५
३२ पेस्तम सागर रोड ४
३३ पेस्तम सागर रोड ३
३४ पेस्तम सागर रोड २
३५ सहाकारनगर जंक्शन
३६ पेस्तम सागर रोड १
३७ अमर महल जंक्शन
पर्यायी मार्गाबाबत मार्गक्रमणाच्या सुचना उपलब्ध पर्यायी मार्ग
१ घाटकोपर पुर्व कडील वाहतूक ९० फिट रोडने पंतनगर पो. ठाणे समोरून एजीएलआर रोडने-श्रेयस जंक्शन येथून पश्चिमेस रवाना होईल
२ लाल बहादुर शास्त्री मार्गाचा उपयोग करणारी वाहने हि पुर्व द्रुतगती मार्गाचा वापर करतील.
३ अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा उपयोग करणारी वाहने हि अंधेरी-कुर्ला मार्गाचा वापर करुन पुढे सांताक्रूज चेंबुर लिंक रोडचा वापर करतील.
४ अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा उपयोग करणारी वाहने हि साकीविहार मार्गाचा वापर करुन पुढे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडचा वापर करतील.
५ एम.जी. रोड ने जाणारी वाहने चॅरिस्टर नाथ-पै मार्गाचा वापर करून पुढे ९० फुट रोड मार्ग पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करून इच्छुक स्थळी जातील.
कार्यक्रमाच्या वाहनांकरीता उपलब्ध जागा पार्कीग ठिकाणाची माहिती
१ लोकमान्य टिळक टर्मिनर्स जवळ
२ पुर्व द्रुतगती महामार्ग, गोदरेज कंपनी ते जेव्हिएलआर जंक्शन पर्यंत, दक्षिण व उत्तर वाहिनी सर्विस रोड
३ मानेकलाल मैदान, मानेकलाल रोड, घाटकोपर (प), मुंबई
४ विएमसी मैदान विर सावरकर मार्ग, विक्रोळी, मुंबई.
५ बृहन्मुंबई महानगरपालिका जकात नाका मैदान, महाराणा प्रताप चौक, मुलूंड पश्चिम,
६ बृहन्मुंबई महानगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, डंम्पींग रोड, मुलूंड पश्चिम,
७ मुलूंड-गोरेगांव लिंक रोड, दक्षिण वाहिनी, रस्त्याच्या लगत, भांडुप पश्चिम,
८ बी.एस.टी. बेस्ट डेपो, एसीसी सिमेंट रोड, मुलूंड पश्चिम,
९ वेगळी जागा उपलव्ध झाल्यास कळविण्यात येईल.