मुंबई

Ghatkopar hoarding collapse : घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

MLA Nitesh Rane Target Sanjay Raut For Ghatkopar hoarding collapse : आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा आरोप, तर आमदार राम कदम MLA Ram Kadam यांनी उद्धव ठाकरे आणि कंपनीचे मालक भावेश भिडे Bhavesh Bhide यांचा फोटो ट्विट

मुंबई :- घाटकोपर दुर्घटनेनंतर Ghatkopar hoarding collapse आता या प्रकरणात भाजपच्या BJP वतीने उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या गटावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संजय राऊत Sanjay Raut यांचे बंधू सुनील राऊत Sunit Raut यांचा आणि संबंधीत कंपनीचे मालक भावेश भिंडे यांचा काय संबंध आहे? असा सवाल नीतेश राणे यांनी विचारला आहे.घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर 100 फूट उंच आणि 250 टन वजनाचे लोखंडी होर्डिंग पडले होते. या वेळी काही कार, दुचाकी आणि पादचाऱ्यांना त्याची धडक बसली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला, तर 74 जण जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणी केवळ भावेश भिंडे यांच्यावरच नाही तर त्यांच्या सर्व पार्टनरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही नीतेश राणे यांनी केली आहे. Ghatkopar hoarding collapse

ज्या कंपनीची होल्डिंग होते. त्या कंपनीला अगोदरच महानगरपालिकेने कार्यकाळ संपला असल्याने नोटीस दिली होती. तसेच हे होर्डिंग काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कंपनीच्या मालकाने महानगरपालिकेचे ऐकले नाही. या कंपनीच्या मालकाचे नाव भावेश भिंडे असून हा नेमका कोणाचा पार्टनर आहे? असा प्रश्न नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आणि भावेश भिंडे यांचे काय संबंध आहे? असे देखील नीतेश राणे यांनी म्हटले आहे. Ghatkopar hoarding collapse

रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसून पत्र लिहीत बसण्यापेक्षा एक पत्र पोलिस आयुक्तांना लिहावे असे आवाहन नीतेश राणे यांनी संजय राऊत यांना केले आहे. भावेश भिंडे यांचे जे पार्टनर आहेत, जे या प्रकरणाचे जबाबदार आहेत. ज्यांच्यामुळे मुंबईकरांना जीव गमवावाव लागला. योग्य वेळी होल्डिंग काढली असती तर सगळे मुंबईकर जिवंत असते, त्यांच्या कुटुंबावर संकट आले नसते. म्हणून या दुर्घटनेतील जबाबदार असणारे भावेश भिंडे सह त्यांचे पार्टनर, त्या सगळ्यांवर एफआयआर दाखल व्हावी. त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे. MLA Nitesh Rane Target Sanjay Raut For Ghatkopar hoarding collapse

आमदार राम कदम यांचे ट्विट, उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे याचा फोटो ट्विट

14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते..हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेता आहेत..
कुठे फेडणार हे पाप..?

पोलिसांकडून कारवाई

मुंबई पोलिस, अग्निशमन दल, एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले होते. सुरुवातीला 100 हून अधिक लोक होर्डिंगखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. हळूहळू लोकांना बाहेर काढले जात होते. यानंतर एनडीआरएफने मोर्चा सांभाळला. या अपघाताची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सायंकाळी दाखल झाले होते. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळपासून बचावकार्य सुरू आहे. आम्ही 88 लोकांना बाहेर काढले असून त्यापैकी 14 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात या कंपनीचे मालक भावेश भिंडे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0