PM Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 मे आणि 17 मे मुंबई दौऱ्यावर, दौऱ्यापूर्वी मुंबईत सुरक्षा वाढवली, ड्रोन उडवण्यावर बंदी, कलम 144 अंतर्गत आदेश जारी
ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलूनवर बंदी असेल
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 मे रोजी मुंबईत रोड शो करणार आहे.तर 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीच्या उमेदवारांकरिता प्रचार सभा घेणार आहे. याआधी पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी कलम 144 अंतर्गत नियमावली जारी करण्यात आले आहे.फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
पंतप्रधानांचा मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर असे आदेशीत करण्यात आले आहे की दि. 15 मे 2024 आणि 17 मे 2024 रोजी विक्रोळी, कांजुरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुनाभट्टी, बी.के.सी., खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ, बांद्रा, वरळी, माहिम, दादर, आणि शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांच्या हद्दीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, सर्व प्रकारची फुगे, पतंग व रिमोट कंट्रोल मायकोलाइट एअरकापट प्रतिबंध राहील.
दहशतवादी आणि देशविरोधींच्या संभाव्य कारवायांना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान तसेच व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या हवाई निगराणीचा देखील समावेश असणार आहे. ते पुढे म्हणाले की, संरक्षण आणि निमलष्करी दलांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते.