क्राईम न्यूजमुंबई

Nala Sopara Crime News: मयत ब्रिजेश चौरसिया याचे मृत्युचे रहस्य उलगडले

Nala Sopara Crime News Pelhar Crime Branch Arrested Murder Criminal : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश, मयत चौसिया यांच्या मृत्यूचे रहस्य उघडून आरोपींना केले अटक

नालासोपारा :- पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत (17 जानेवारी ) रोजी दुपारी 02.88 वा.च्या सुमारास अशोक गुंजाळकर यांच्या धानिव पांढरीपाडा नालासोपारा येथील खोल दगडाच्या खदानीमध्ये एक इसम पडून मयत झाला असल्याबाबत आरबाज राजु राईन, (21 वर्षे), रा. धानिवबाग नालासोपारा यांनी दिलेल्या खबरीवरुन पेल्हार पोलीस ठाणे Pelhar Police Thane येथे अकस्मात मृत्यु नोंद करण्यात आला होता. प्रकरणाची चौकशी पोलीस हवालदार भाईदास शिंगाणे पेल्हार पोलीस ठाण्यात हे करीत होते. प्रकरणाचे चौकशीत खदाणीत मिळुन आलेले प्रेत हे ब्रिजेश कामताप्रसाद चौरासिया, (41 वर्षे),यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मयत याची बहिण सारिका चौरसिया यांनी मयत याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होती. Nala Sopara Crime News

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना योग्य त्या सूचना देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत आदेशित केले. Nala Sopara Crime News

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर प्रकरणाची चौकशी करुन मयत यांची बहिण व साक्षीदार यांच्याकडे चौकशी करुन मयत व त्याचा मित्र बलराम यादव हे दोघे दि. 17 जानेवारी 2024 रोजी सदरचा गुन्हा घडेपर्यत एकत्र सोबत असल्याचे व मयत ब्रिजेश हा खदानीमध्ये पडला तेव्हा खदानीच्या जवळ असलेल्या लोकांनी एका इसमाने मयत ब्रिजेश यास धक्का देऊन खदानीमध्ये ढकलून पळून जात असल्याबाबत सांगितले. म्हणून इसम बलराम लालचंद यादव ऊर्फ बलीराम, (27 वर्ष), यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मयत ब्रिजेश चौरसिया याचेकडून यापूर्वी एकुण 55 हजार रुपये घेतले होते. त्यापैकी 22 हजार रुपये परत देऊन देखील ब्रिजेश याने बलराम यादव यास 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी जाबरपाडा येथील राहत्या दुकानगाळयात बोलावून त्याच्याकडुन 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर 3 लाख रुपये घेतल्याचे लिहून घेऊन त्यास रात्रभर डांबून ठेऊन शिवीगाळी व दमदाटी करुन पैसे मागितलेले होते. त्यामुळे बलराम यादव याने मयतास 17 जानेवारी 2024 रोजी मयत हा पैश्याकरीता तगादा लावत असल्याचा व रात्रभर डांबून ठेवल्याचा राग मनात धरुन दुपारी 02.00 वा. च्या सुमारास धानिय पांढरीपाडा याठिकाणी मयताचा जिव घेण्याच्या उद्देशाने त्यास धक्का देऊन रस्त्यालगतच्या खोल दगडाच्या खदानीमध्ये ढकलुन देऊन त्यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाल्याने बलराम लालचंद यादव ऊर्फ बलीराम, (27 वर्ष) रा. नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर याचे विरुध्द तक्रार दिल्याने पेल्हार पोलीस ठाणे येथे भादविस कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nala Sopara Crime News

पोलीस पथक

जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडल 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन मोहिते, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखील मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, सर्व नेमणुक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0