Panvel Shivsena Group : पनवेल परिसरातील महामार्गावरील मोठ मोठे लोखंडी बँनर तातडीने हटविण्यांची शिवसेनेची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल : नुकतीच मुंबई मध्ये लोखंडी बँनर (Ghatkopar hoarding Collapse) च्या घडलेल्या दूरघटनेमुळे अनेकांचा जीव गेला व कित्येक जखमी झाले आहेत तरी पनवेल महानगरपालिकेने तातडीने (Panvel Municipal Corporation) पनवेल मुर्बा महामार्गावरील भलेमोठे टोलेजंग लोखंडी बँनर हटवावे अशी मागणी आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील Panvel Shivsena Member Babanrao Patil यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हणजे आहे की, पनवेल मुब्रा महामार्गावरील तळोजा फेज-१अडंरबायपास रोडवरील मोठमोठे लोखंडी बँनर लावले आहेत, सध्या वादळी वार्यासह पाऊस पडत असल्याने हे तकलादू बँनर पडून दुरघटना होऊ शकते व नाहक जीवितहानी होऊ शकते तरी पनवेल परिसरातील असे अनेक बँनर तातडीने हटविण्यांची मागणी जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी केली आहे.
फोटो : बबनदादा पाटील