मुंबई

Panvel News : पनवेल पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई: ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५७ आरोपींना अटक!

•बस डेपो आणि रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणाऱ्या टोळ्या जेरबंद

पनवेल :- पनवेल पोलिसांनी जुलै महिन्यात गुन्हेगारांना चांगलाच हादरा दिला आहे. या विशेष मोहिमेत तब्बल ३८ गुन्हे उघडकीस आणले असून, ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत चोरी, दरोडा, घरफोडी आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वापरलेला आणि चोरलेला ७४ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे पनवेलमध्ये गुन्हेगारीला मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

या मोहिमेदरम्यान, पोलिसांना अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्याबाहेरही जावे लागले. एका प्रकरणात, ‘खजिना’ देण्याच्या बहाण्याने एका कुटुंबाची ३९.७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तौसिफ मुजावर याला पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडून सर्व चोरीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात, ७.२५ लाख रुपयांचे आयफोन चोरून ओडिशात पळालेल्या आरोपी अशोक ज्योतिष घराई याला पकडण्यासाठी पनवेल पोलिसांना अग्निशमन दलाच्या मदतीने बोटीने ८ किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

ही सर्व यशस्वी मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भामरे, सहआयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त (झोन ३) प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0