मुंबई

Panvel News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना शाखा देवद पनवेल आयोजित गावात नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा

पनवेल : देवद गावातील  नारळी पौर्णिमा Narali Porrnima कार्यक्रम जगदीश पाटील साई भक्त गायक यांच्या येण्याने आल्यानंतर उत्साहाला जोश आला. शोभा यात्रा मिरवणूक काढण्या आधी जगदीश पाटीलाना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे,हेमंत म्हात्रे, बिपिन झुरे, राजेश वायरे, नंद किशोर मांजरेकर, विनोद भोईर दादा यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. Panvel Latest News

खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. देवद येथील अनेक कोळी बांधव महिलानी  पूजा करुन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात.दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मच्छिमारी व्यवसाय आणि जल व्यापार पुन्हा सुरू केली जाते. म्हणूनच या सणाचा कोळी बांधवांमध्ये या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याचे दिवस वगळता संपूर्ण वर्षभर कोळी बांधव समुद्रात बोटीवर असतो. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षिततेसाठी कोळी महिला समुद्र देवाची पूजा करतात. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण केला जातो. नारळ हे सर्जनशक्तीचे प्रतीकही मानले जाते. तसंच, या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला समुद्राला दाखवतात. Panvel Latest News

खोल समुद्रात जाणार्‍या आमच्या धनी कुंकवाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत, असे गार्‍हाणे कोळी महिला समुद्राला घालतात. नारळी पौर्णिमेच्या शोभा यात्रा मिरवणूकीत शिवसेना युवासेना शाखा देवद येथून निघून गावदेवी मंदिर ते देवद ग्रामपंचायत जवळ गाढी नदीत नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कोळी बांधव महिलांसह शिवसेना विधानसभा संघटक दिपक निकम,शाखा प्रमुख सुरेश माने, उप शाखा प्रमुख मनोहर कदम, भिकाजी चव्हाण, योगेंद्र यादव,मोहन खुजे, सिद्धेश चव्हाण, ऋतिक टावरी शिवसेनेच्या महानगर संघटिका सौ लीनाताई गरड, व त्यांचे पती श्री अर्जुन गरड कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक श्री मधु पाटील शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख श्री विश्‍वास पेटकर उपस्थित होते, महिला संघटिका तनुजा झुरे, अर्चना चव्हाण, उज्वला कांबळी,अर्चना पाटील, ऋतुजा हिरलेकर, श्रद्धा वायंगणकर, रुहीता कांबळी, मीना यादव उपस्थित होत्या. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0