
Shivsena UBT Latest News : ठाकरे बंधूंच्या 7-8 सभांचे नियोजन; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची जोडगोळीही मैदानात उतरणार
मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत असून, प्रचाराचा धुराळा उडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या 40 स्टार प्रचारकांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनुभवी नेत्यांपासून ते आक्रमक वक्त्यांपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद दाखवण्यासाठी आज पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली महासभा होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
शिवसेनेचे 40 ‘दबंग’ प्रचारक
ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे:
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
सुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिरलेकर
नितीन पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
लक्ष्मण वाढले
मनोज जामसुतकर
नितीन देशमुख
सुषमा अंधारे
संजय जाधव
ज्योती ठाकरे
जयश्री शेळके
जान्ह्वी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
हारुन खान
सिद्धार्थ खरात
वैभव नाईक
आनंद दुबे
अशोक तिवारी
राम साळगावकर
प्रियांका जोशी
अनिश गाढवे
विक्रोळीत आज ‘ठाकरे’ गर्जना!
मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येत आहेत. विक्रोळीतील ही पहिली सभा असून, यानंतर मुंबईत दोन्ही नेत्यांच्या आणखी 7 ते 8 संयुक्त सभांचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ सभाच नव्हे, तर दोन्ही नेते एकत्रितपणे शिवसेना आणि मनसेच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणार आहेत.
आदित्य-अमित ठाकरेंचीही जुगलबंदी
वडिलांप्रमाणेच पुढच्या पिढीतील नेते म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही मुंबईत दोन संयुक्त सभा होणार आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि युतीची ताकद दाखवण्यासाठी हा विशेष प्रयोग केला जात आहे.


