मुंबई

Panvel News : नवीन पनवेल परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पनवेल महापालिकेकडे मागणी

पनवेल (संजय कदम) : नवीन पनवेल New Panvel परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Panvel Thackeray Group पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शहरप्रमुख यतिन देशमुख Panvel Thackeray Group Yatin Deshmukh यांनी पनवेल महापालिकेचे शहर Panvel Municipal Corporation अभियंता संजय कटेकर Sachin Ketkar यांची भेट घेवून नविन पनवेल शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन दिले. त्याचप्रमाणे महानगर गॅसचे काम करताना रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. यावर तात्काळ उपाय करण्याची मागणी केली, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल अशी सूचना वजा इशारा देण्यात आला. यावेळी उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, विभाग प्रमुख किरण सोनावणे , शाखा प्रमुख दिपक शेडगे, गोविंद जोग , ओमकार धावडे , मृण्मय काणे हे उपस्थित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0