मुंबई

Panvel News : सील आश्रम व नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने निराधारांसाठी बचाव मोहीम

पनवेल : सील आश्रम आणि नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने 15 दिवसांच्या कालावधीसाठी परिसरात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे नाव रेस्क्युनाइट 2024 मिशन असे असून त्याद्वारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर भटकणार्‍या निराधार आणि गरजूंना वैद्यकीय मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना चांगले जीवन प्रदान करण्याचे कार्य करण्यात येणार आहे.
या मिशनचे उदघाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील सील आश्रम, वांगणी – नेरे, येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अब्राहम मथाई, मिलिंद वाघमारे (मानवी तस्करी विरोधी युनिट), सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील, वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सील आश्रमाचे संस्थापक के. एम. फिलिप, मुख्य समन्वयक लाइजी वर्गीस (रेस्क्युनाइट ड्राइव्ह 2024) आदी उपस्थित होते.
जर रस्त्यावर कोणी निराधार व्यक्ती दिसल्यास सील आश्रम आणि पोलिसांना तात्काळ कळवा आणि आम्हाला जनसेवेचे संधी द्या, असे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. अब्राहम मथाई, अशोक राजपूत आणि इतर पोलीस अधिकार्‍यांनी रुग्णांना उपचारासाठी नेणार्‍या रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवला. या बचाव कार्यासाठी आयओसीएल कडून 2 रुग्णवाहिका देणगी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. त्यांचे संस्थेमार्फत आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0