मुंबई
Panvel News : शिवसेना उबाठा गटातील अनेक पदाधिकार्यांनी केला खा.श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
पनवेल महाराष्ट्र मिरर : तालुक्यातील शिवसेना उबाठा गटातील अनेक पदाधिकार्यांनी आज खा.श्रीरंग बारणे MP Shrirang Barne यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
खा.श्रीरंग बारणे यांच्या मावळ पुणे येथील कार्यालयात शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्र बाळासाहेब नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा गटातील शहर संघटक बाळासाहेब आवारी, करंजाडे संपर्क प्रमुख चंद्रकांत गुजर, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख वसंत सोनवणे, मा.ग्रा.पं.सदस्य नाथाभाई भरवाड आदींनी आज जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांचे स्वागत खा.श्रीरंग बारणे यांनी करून त्यांना पक्षामध्ये योग्य तो मान सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.