Panvel News : वाहतुकदारांची फसवणूक करून रस्त्यालगतचे सरकारी पाईप चोराला गुन्हे शाखा युनिट तिनच्या टीमने केली अटक
वाहतुकदारांची फसवणूक करून रस्त्यालगतचे सरकारी पाईप चोराला गुन्हे शाखा युनिट तिनच्या टीमने केली अटक
पनवेल : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यालगत जलवाहिन्या व ईतर कामासाठी टाकलेले सरकारी लोखंडी पाईप चोरणारा सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखा युनिट तिन ने शिताफीने पकडला असून त्याची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी,उरण,खारघर, उल्हासनगर व मुंबई येथील रस्त्यालगत जलवाहिन्या व ईतर कामासाठी ठेवलेले पाईप व केबल चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत होत्या परंतु या चोर्या करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. चोरी करण्याची ठिकाणे बदलून हा सराईत गुन्हेगार चोरी करत असे. एहसनुल्लाह मोहम्मद नाईम शेख ऊर्फ सानू रा साकीनाका व त्याचा साथीदार राजपथ रमामिलान गौड यास अटक केलेल्या चोराचे नाव असून याला युनिट तिनच्या पथकाने गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेवुन अटक केली आहे. सदर सराईत हा महामार्ग व नवीन विकसित होत असलेली ठिकाणे हेरून त्या रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनी साठी व इतर कामासाठी टाकलेले पाईप सदर ठिकाणची रेकी करून सुट्टीच्या दिवशी चोरी करत असे. या कामासाठी तो नवी मुंबई मधील रस्त्याने जात असलेले हायड्राक्रेन व ट्रेलरचा उपयोग करत असे. सदर चोर हा मोबाईल वरून हायड्राक्रेन व वाहनतळावरील ट्रेलर वरून ट्रेलर मालकाचा नंफर मिळवून त्यांना फोन करून ट्रेलर व डायड्राक्रेन चा समन्वय घडवून शिताफीने पाईप गाडीवर लोड करून भंगारवाल्यांना हे पाईप विकत असे. हायड्राक्रेन व वाहतूकदारांना नियमित भाड्यापेक्षा थोडे जास्त व रोख स्वरूपात भाडे देत असल्याने व सुट्टीच्या दिवशी व्यावसाय भेटत असल्याने सदर व्यावसायिक हे कुठलीही शहनिषा न करता सदर सराईताला आपली वाहने देत असतं त्या मुळे चोरी करने सोपे जात असे सदर गुन्हेगार हा एका कामचे वेळी एकच फोन व एकच सिमकार्ड वापरत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट तिनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलानी, एपीआय संतोष चव्हाण, लिंगराज देवकाते, चेतन जेजूरकर, दिनेश जोशी, सुधिर पाटील यांच्या पथकाने पकडून त्यांची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली आहे.
: नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यालगत जलवाहिन्या व ईतर कामासाठी टाकलेले सरकारी लोखंडी पाईप चोरणारा सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखा युनिट तिन ने शिताफीने पकडला असून त्याची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी,उरण,खारघर, उल्हासनगर व मुंबई येथील रस्त्यालगत जलवाहिन्या व ईतर कामासाठी ठेवलेले पाईप व केबल चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत होत्या परंतु या चोर्या करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. चोरी करण्याची ठिकाणे बदलून हा सराईत गुन्हेगार चोरी करत असे. एहसनुल्लाह मोहम्मद नाईम शेख ऊर्फ सानू रा साकीनाका व त्याचा साथीदार राजपथ रमामिलान गौड यास अटक केलेल्या चोराचे नाव असून याला युनिट तिनच्या पथकाने गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेवुन अटक केली आहे. सदर सराईत हा महामार्ग व नवीन विकसित होत असलेली ठिकाणे हेरून त्या रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनी साठी व इतर कामासाठी टाकलेले पाईप सदर ठिकाणची रेकी करून सुट्टीच्या दिवशी चोरी करत असे. या कामासाठी तो नवी मुंबई मधील रस्त्याने जात असलेले हायड्राक्रेन व ट्रेलरचा उपयोग करत असे. सदर चोर हा मोबाईल वरून हायड्राक्रेन व वाहनतळावरील ट्रेलर वरून ट्रेलर मालकाचा नंफर मिळवून त्यांना फोन करून ट्रेलर व डायड्राक्रेन चा समन्वय घडवून शिताफीने पाईप गाडीवर लोड करून भंगारवाल्यांना हे पाईप विकत असे. हायड्राक्रेन व वाहतूकदारांना नियमित भाड्यापेक्षा थोडे जास्त व रोख स्वरूपात भाडे देत असल्याने व सुट्टीच्या दिवशी व्यावसाय भेटत असल्याने सदर व्यावसायिक हे कुठलीही शहनिषा न करता सदर सराईताला आपली वाहने देत असतं त्या मुळे चोरी करने सोपे जात असे सदर गुन्हेगार हा एका कामचे वेळी एकच फोन व एकच सिमकार्ड वापरत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट तिनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलानी, एपीआय संतोष चव्हाण, लिंगराज देवकाते, चेतन जेजूरकर, दिनेश जोशी, सुधिर पाटील यांच्या पथकाने पकडून त्यांची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली आहे.