क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai ACB Trap News : 35 हजारांची लाच घेताना एजंट आणि सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात, मुंबई अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

Mumbai Latest ACB Trap News : तक्रारदाराकडून 55 हजारांची लाच मागितली, तडजोडीअंतर्गत 35 हजारांची रक्कम ठरली. ही लाचेची रक्कम घेताना खाजगी एजंट याला 32 हजार आणि सहाय्यक दुय्यम निबंधकाला 3 हजार लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

मुंबई :- घराचे रजिस्ट्रेशन कागदपत्र देण्यासाठी 35 हजरांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी एजंट आणि सहाय्यक दुय्यम निबंधकाला मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. Mumbai ACB Trap News विशाल मारुती येरापाले (खाजगी व्यक्ती) आणि गजानन प्रल्हादराव खोत या अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराकडे त्याने 55 हजारांची मागणी केली होती. Mumbai Bribe News

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटचे रजिस्ट्रेशन सह दुय्यम निबंधक अंधेरी क्रमांक चार खार मुंबई येथे 18 मार्च 2025 रोजी झाले त्या रजिस्ट्रेशनचे कागदपत्र मिळवण्यासाठी खाजगी एजंट आणि लाचखोर सह दुय्यम निबंधकांने तक्रारदाराकडे 55 हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडअंती ही रक्कम 35 हजार रुपये ठरली होती.

सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात विशाल येरापाले (खाजगी एजंट) 32 हजार आणि गजानन प्रल्हादराव खोत (सह दुय्यम निबंधक ) यांना तीन हजार रुपये स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत अटक केली. गजानन खोत यांच्यासोबत विशाल येरापाले खाजगी व्यक्ती देखील मुंबई अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. आरोपींच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई संदीप दिवाण अपर पोलिस आयुक्त, ला.प्र.वि, मुंबई,अनिल घेरडीकर अपर पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1) ला.प्र. वि, मुंबई ,राजेंद्र सांगळे अपर पोलीस उप आयुक्त ला.प्र. वि, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद सावंत सहाय्यक पोलीस आयुक्त ला.प्र. वि . मुंबई.निलेश पाटील पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि., बृहन्मुंबई . यांनी लाचखोर अधिकारी आणि एजंटला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0