Panvel News : के.व्ही.एस ट्रस्ट व ड्राय स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मदतीचा हाथ
मुलांच्या विकासासाठी आरोग्य,शिक्षण,आहार महत्वाचे..डॉ.प्राध्यापक क्रिष्णा कुमार
पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील अदाई गाव येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था के.व्ही.एस ट्रस्ट च्या माध्यमातून समाज उपयोगी अनेक उपक्रम वर्षभर राबवले जात असतात.सी एस आर फंडाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला रोजगार अश्या विविध कल्याणकारी उपक्रम व्हावे यासाठी डॉ.प्राध्यापक क्रिष्णा कुमार सातत्याने कार्य करत असतात. दि.२४ मे रोजी ड्राय स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमानाने गरीब ,गरजू ,वंचीत अश्या बालकांना पोषक आहार व शालेय भेट वस्तू वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रम माध्यमातून जनजागृती व मार्गदर्शन करून शैक्षणिक ,सामाजिक व आरोग्य विषयक माहिती समजून घेतली भविष्यात त्यांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी नियोजन करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
ह्यावेळी संचालक डॉ.प्राध्यापक क्रिष्णा कुमार , ड्राय स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पी डी.एम्.लीलाक्षी मरचंडे , मार्केटिंग मॅनेजर शिवांगी मिश्रा ,नितीन आगाज, पपींदर कौर आदी मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.