Mumbai No Parking: शिवडी मध्ये वाहन पार्किंग करण्यास सक्त मनाई, पोलीस उप आयुक्तांचे निर्देश
Mumbai No Parking South Region Area : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघाच्या ईव्हीएम मशीनच्या नियंत्रण कक्ष (स्ट्रॉग रूम) असल्यामुळे 4 जून पर्यंत वाहन पार्किंग करण्यास मनाई आदेश
मुंबई :- राज्याच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडले आहे. मुंबईसह राज्यात 11 ठिकाणी वेगवेगळ्या मतदार संघात लोकसभेचे मतदान झाले होते. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या नंतर ज्या ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीन शिवडीच्या वेअर हाऊस येथे ठेवण्यात आले आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे यांनी 23 मे पासून ते 04 जून पर्यंत शिवडी लगत असलेल्या आजूबाजूच्या परिसरात वाहन पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहे. Mumbai No Parking South Region Area
वाहनास पार्कींग करण्यास मनाई करण्यात आलेला रस्ता
1) गाडी अड्डा जंक्शन ते शिवडी वेअर हाऊस स्ट्रॉग रूम मेनगेट शिवडी पुर्व मुंबई.
2) शिवडी वेअर हाऊस स्ट्रॉग रूम मेनगेट ते रेतीबंदर कडे जाणारा रोड शिवडी पुर्व मुंबई.
वाहने पार्कींग करण्यास उपलब्ध असलेला रस्ता / मार्ग
इंदिरा नगर हे बंदर रोड पासुन पुढे एल. बी. एस कॉलेजकडे जाणारा रोड शिवडी पुर्व.
याप्रकारे वाहतूक व्यवस्थेमध्ये तसेच वाहन पार्किंग मध्ये बदल केला असून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे.