मुंबई

Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल:- पनवेल तालुक्यातील एन.के.गार्डन वावंजे येथे बंद घरात घरफोडी करणार्‍या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उत्तम कुरकुटे हे एन.के.गार्डन वावंजे, ता.पनवेल येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शब्बीर खान (24) याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत जावून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो.हवा.महेश धुमाळ, सतीश तांडेल, विजय देवरे, सुनील कुदळे, पो.शि.राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भिमराव खताळ आदींच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला असताना पोलीस हवालदार सतीश तांडेल यांना खास खबर्‍याकडून सदर आरोपीची माहिती मिळाली व तो पुणे येथे लपल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पुणे येथे जावून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago