मुंबई

Panvel Crime News : कामोठे महामार्गावर १७ लाखांचा गुटखा जप्त, टेम्पो चालकाला अटक

पनवेल जितिन शेट्टी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठे शहरानजीकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी काल रात्री एका टेम्पोवर धाड टाकली. यावेळी १७ लाख ४० हजार रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून, ५ लाख रुपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरे आणि कामोठे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारा टेम्पो रोखून तपासणी केली असता, त्यातून महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा आढळून आला. टेम्पो चालक फरहान मजीद शेख (वय २३, रा. कांदिवली) याला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निवडी (ठाणे) येथील शौकत अली याचा पोलिस शोध घेत आहेत; मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जप्त केलेल्या टेम्पोची किंमत ५ लाख रुपये आहे. हा गुटखा विक्रीसाठी कोठे नेण्यात येत होता, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार जनार्दन सहदेव पवार यांनी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्री करणारे एजंट आणि दुकानदार सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0