मुंबई

Panvel Akash Education Gift Ceremony : आकाश एज्युकेशनल सर्विस लिमिटेड पनवेल येथील महाराष्ट्रात सर्वोच गुण मुळवून एव्हल नंबर येऊन सानिध्य डोंगरेने मारली बाजी

Panvel Akash Education Gift Ceremony : पनवेल येथील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या 10 वी चा विद्यार्थी सानिध्य क्षितिज डोंगरे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षा 2024 मध्ये सर्वोच्च गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे.

पनवेल (जितीन शेट्टी) :- १० वी च्या सानिध्य डोंगरे यांनी CBSE 2024 परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून सामाजिक विज्ञान आणि विज्ञानामध्ये ९९.६० टक्के गुण मिळवून प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे.तसेच जर्मनी भाषेत देखील आव्हल आलेल्या सानिध्य डोंगरे याचे महाराष्ट्रातून नव्हे तर पनवेल मधून देखील कौतुक होत आहे.

आकाश एज्युकेशनल Akash Education सर्व्हिसेस लिमिटेड पनवेल (AESL) प्रती कृतज्ञता व्यक्त करताना, सानिध्यने तिच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे कौतुक केले.त्याने संस्थेला संपूर्ण अभ्यास साहित्य आणि कठोर प्रशिक्षण पुरविल्याबद्दल श्रेय दिले, ज्यामुळे सानिध्य ला कमी वेळेत कठीण संकल्पना प्रभावीपणे समजून घेता आल्या.

आकाश एज्युकेशनल Akash Education सर्व्हिसेस लिमिटेड पनवेल (AESL) च्या सर्व शिक्षक वर्गाने अतिपरिश्रम घेऊन शिक्षणकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सानिध्याला यश प्राप्त झाले
विविध अभ्यासक्रमांच्या सह विद्यार्थ्यांना आवश्यक परिचय आणि आत्मविश्वास देखील मिळतो, ज्यामुळे ते परीक्षेला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात.आणि महाराष्ट्रात असेच सर्वोच गुण मुळवून एव्हल नंबर येणे हेच आमच्या मेहनतीची पोच पावती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0