आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही
पालघर – बुधवार ६ मार्च रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वॉलपेपर आणि इतर वस्तू ठेवलेल्या कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तारापूरच्या बोईसर औद्योगिक परिसरात असलेल्या गोदामात मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आहगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, तेथे काही रासायनिक युनिट्सही आहेत, असे पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. Palghar Fire News
बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली
आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या आणि परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ज्या गोदामात पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) वॉलपेपर आणि कार्पेट ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत आणि आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. Palghar Fire News