Online Treading Fraud : ऑनलाइन फसवणूक ; ट्रेडिंग मार्केट बाबत जाहिराती पाठवून तब्बल 39 लाखांची फसवणूक
Online Treading Fraud : Kotak ॲप डाउनलोड करून त्यामधून ट्रेडिंग केल्यास नफा मिळण्याचे आमिष, त्यानंतर ऑनलाईन फसवणूक
ठाणे :- सायबर भामट्यांपासून Thane Cyber Scammer सावधान राहण्याकरिता सायबर विभागाकडून Thane Cyber Department सातत्याने जनजागृती केली जाते. परंतु सायबर फसवणुकीच्या आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच शेअर मार्केट ऑनलाईन टास्क Share Market Fraud Task यांसारखे जाहिराती देऊन अधिकच्या नफ्याच्या आमिष दाखवून फसवणूक Online Treading Fraud झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना ठाण्याच्या वसंत विहार परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्ती व्यक्तीसोबत झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली Share Market Fraud In Thane तब्बल 39 लाख 57 हजार रुपयाची फसवणूक ऑनलाईन झाली आहे. त्याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात Chitalsar Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटाचलम कृष्णन (68 वर्ष) हे ठाण्याच्या वसंत विहार पोखरण रोड येथे राहत असून यांना ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान अनोळखी व्यक्तींनी व्हाट्सअप वर ऑनलाइन ट्रेडिंग मार्केट बाबत जाहिरात पाठवून एका व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले. त्यानंतर त्यांना कोटक हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्यांनी त्यावर रजिस्टर करून शेअर्स खरेदी विक्रीसाठी एकूण 39 लाख 57 हजार दोन रुपये ऑनलाईन रक्कम गुंतवणूक केली. परंतु त्यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर कोणताही आर्थिक परतावांना न मिळाल्याने त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्याबद्दल त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंगुर्लेकर करत आहे. Thane Latest Crime News