क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kashmira Police News : काशिमिरा पोलिसांची कारवाई; महिला आरोपीकडून हेरॉईनसह २.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे, दि. २८ ऑगस्ट : काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करून तिच्या ताब्यातून तब्बल १,९२,००० रुपये किंमतीचे १६ ग्रॅम हेरॉईन व २०,१०५ रुपये रोख असा एकूण २,१२,१०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Mira Bhayandar Police Latest News

दि. २४ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, काशिमिरा पोलिसांनी पेणकरपाडा अग्निशमन केंद्राजवळील दरवेश म्हाडा बिल्डिंग येथे छापा टाकला. या कारवाईत नसीम खलील शेख (वय ६०, रा. लोढा म्हाडा बिल्डिंग, मिरारोड-पूर्व) हिच्या ताब्यातून अंमली पदार्थासह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

या प्रकरणी गु.र.नं. ३७५/२०२५, कलम ८(क), २१(ब) एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेस अटक करून तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि संजियनी सोलनकर करीत आहेत.

आरोपी नसीम खलील शेख हिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी केली असता, तिच्याविरुद्ध पूर्वीही गु.र.क्र. २५९/२०२५, कलम ८(क), २१(अ) एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात ती जामिनावर होती.

या यशस्वी कारवाईसाठी निकेत कौशिक (पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार), दत्तात्रय शिंदे (अपर पोलीस आयुक्त), राहुल चव्हाण (उप पोलीस आयुक्त, परिमंडळ-१), गणपत पिंगळे (सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजित आंधळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कारवाईत सपोनि योगेश काळे, पोउनि शिवाजी खाडे, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, डोभाळ, ढोबळे, पंडागळे, राजेंद्र सुर्यवशी आणि संदिप चौधरी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0