ऑनलाइन फसवणूक : शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 32 लाखांची फसवणूक
Thane Online Share Market Fraud News : कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तांत्रिक मदतीने पोलिसांकडून आरोपीचा शोध
Online Fraud: As much as 32 lakh fraud in the name of share market
ठाणे :- शेअर मार्केटच्या Share Market Trading नावाखाली ऑनलाइन फसवणूक Online Fraud झाल्याची घटना ठाण्याच्या कासारवडवली Thane Kasarwadi परिसरात समोर आली आहे. इनायत ख्वाजा शेख (34 वर्ष) याला अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, आणि शेअर ट्रेडिंग बाबत क्लासेस याबाबत मार्गदर्शन दिले जाते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून त्यांना शेअर ट्रेडिंग करण्याकरिता ऑनलाइन खाते खोलण्यास सांगितले. त्यानंतर त्या खात्यावरून त्यांचे तब्बल 32 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Thane Share Market Fraud News
ऑनलाइन ट्रेडिंग ने 32 लाखाचा आर्थिक गंडा
मार्च ते जून या महिन्याच्या कालावधीत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याकरिता बँक ऑफ बडोदा बँक खाते दोन त्यांनी ऑनलाईन 32 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक केली होती. त्यांना आर्थिक नफा मिळेल असे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडत शेख यांनी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यानंतर कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात Kasarwadwali Police Station आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कौटकर हे करीत आहेत. Thane Share Market Fraud News