Action of Kidwai Police : 31 वर्षापूर्वी बेकायदेशीररित्या जमाव जमवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई दंगलीतील फरार आरोपीला मुंबईच्या शिवडी परिसरातून केली फेरअटक
मुंबई :- 1993 मध्ये झालेल्या दंगलीमध्ये जमावाला गोळा करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका फरार आरोपीला मुंबईच्या किडवाई पोलिसांनी Kidwai Police शिवडीतुन अटक केली आहे. वडाच्या किडवाई पोलिसांनी 1993 ला सय्यद नादीर शहा अब्बास खान (1993,35 वर्ष) यांच्या विरोधात सत्र न्यायालयात कलम 143,144,145,146,147,148,149,307,34 प्रमाणे कलम लावून गुन्हा दाखल केला होता. परंतु घडलेल्या घटनेपासून त्या दिवसापासूनच नादिरशहा अब्बास खान हा फरार होता. पोलिसांकडून सातत्याने समन्स पाठवूनही आरोपी हा हजर राहत नव्हता न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीन-पत्र वॉरंट जारी केला होता. Mumbai Crime News
1993 च्या दंगलीतील फरार आरोपीला 31 वर्षांनी घेतले ताब्यात, कुटुंबीयांकडून पोलिसांना सहकार्य नाही
फरार आरोपी सय्यद ना नादिर शहा अब्बास खान (65 वर्ष, सध्याचे वय) याच्या संदर्भात कुटुंबीयांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देत नसल्याने सातत्याने कुटुंब त्याच्या माहिती बाबत टाळाटाळ करत होते. पोलिसांनी कुटुंबीयांचा मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 यांच्या मदतीने सी डी आर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले होते. तसेच आरोपी 29 जून 2024 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने फरार आरोपी हा त्याच्या राहत्या पत्त्यावर येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्या अनुषंगाने महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार कडलग, पोलीस हवालदार लादे, पोलीस शिपाई मंडलिक यांनी सापळा रचून आरोपी याला राहत्या घरातून कायदेशीर बाबीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्तालयात पाहिजे फरारी अटकेची विशेष मोहिम सध्या सुरू आहे. अनुषगांने पोलीस उप आयुक्त परिमंडळ 04, प्रशांत कदम , सहाय्यक पोलीस निरीक्षक माटुंगा विभाग संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार , पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील (पोलीस निरीक्षक गुन्हे), पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे (कायदा व सुव्यवस्था) यांचेकडून वेळोवळी घेतलेल्या बैठकीदरम्यान मार्गदर्शन केलेले होते. त्या अनुषंगाने महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलिस हवालदार सुरेश कडलग, अशोक लादे, पोलीस शिपाई मधूकर मंडलिक, पोलीस हवालदार निकम, पोलीस शिपाई दळवी, महिला पोलीस शिपाई यादव (तांत्रिक मदत व कागदपत्रांचे अवलोकन) या पथकाने 31 वर्षे फरार असलेल्या आरोपीस शिाताफीने फेर अटक करून कौशल्यपुर्ण व तांत्रिक पध्दतीने तपास केला आहे. Mumbai Crime News