Fake Income Tax Officer : आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून व्यापाराची फसवणूक
Mumbai Police Arrested Fake Income Tax Officer : 1930 सायबर हेल्पलाईन मुंबई सायबर गुन्हे शाखेला यश ; दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाची सायबर गुन्हयात फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम रूपये 35 लाख 12 हजार 820 वाचविण्यात यश
मुंबई :- सायबर गुन्हे Cyber Crime Branch शाखेला मोठे यश आले आहे.शहरातील नागरीकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखे अंतर्गत 1930 हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. 13 एप्रिल 2024 दक्षिण मुंबईमध्ये राहणारे व्यवसायिक यांना आरोपींनी ते स्वतः पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे नावे Fedex Courier आलेले असून त्यांच्या बॅक अकाऊंटमध्ये अनाधिकृत टून्झेिक्श्न केल्याचे सांगितले व त्यांना रूपये 35 लाख 12 हजार 820 ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. Mumbai Cyber Crime News
सायबर गुन्हयात आर्थिक फसवणुक झालेले तक्रारदार यांनी त्यांची फसवणुक झालेनंतर 1930 हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क केला असता, त्यांची फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यांवर गोठविण्यात येते.
प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ 1930 सायबर हेल्पलाईनवर संपर्क करून माहीती दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक भोर व पोलीस शिपाई किरण पाटील यांनी तात्काळ NCRP PORTAL वर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून केलेल्या कार्यवाहीमुळे तक्रारदार यांची सायबर गुन्हयात फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम रूपये 35 लाख 12 हजार 820 संबधित बँक खातेवर होल्ड करण्यात 1930 हेल्पलाईन पथक, गुन्हे शाखा, मुंबई यांना यश आले आहे. Mumbai Cyber Crime News
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, आबुराव सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर गुन्हे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम सायबर पोलीस ठाणे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी पार पाडली आहे.
नागरीकांना अहवान
तरी नागरीकांना अहवान करण्यात येते की, त्यांनी सायबर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क करावा जेणेकरून आपली फसवणूक झालेली संपुर्ण किंवा जास्तीत जास्त स्क्कम वाचली जाईल.
Fedex Scam किंवा इतर कुरीयर कंपनीचे नावे Scam प्रकारच्या गुन्हयापासुन वाचण्याकरिता नागरीकांनी खालील काळजी घ्यावी.
अग्रनामांकित कुरीयर कंपन्याचे प्रतिनीधी असल्याचे भासवून आपले बँक खात्यांमधुन अनियमित व्यवहार झाल्याचे किंवा आपले नावे ड्रग्स, हत्यारे, हवाला ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगुन येणारे कॉल हाताळतांना सावधानता बाळगावी.
- पोलीस अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून
- सोशल मिडीयाचे माध्यमातून ओळखपत्र किंवा नोटीस पाठवून आपल्याला अटक करण्यात येईल असे भय
- दाखवले गेल्यास योग्यती शहानिशा करून तसेच घाबरून न जाता नजिकच्या पोलीस ठाणेस संपर्क करावा.
- संभ्रमित होवून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये किंवा अनोळखी व्यक्तीस व बँक खातेवर पैसे पाठवू नये.
- कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० संपर्क साधावा