Mumbai Police News : तक्रार निवारण दिन, आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातून जवळपास 1190 तक्रारीचे निवारण…..!!!
Mumbai Police News : मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हप्त्याच्या दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.
मुंबई :- राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे(Lok Sabha Election ) बिबुल वाजले असताना पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहे. मुंबई पोलिसाच्या (Mumbai Police) आयुक्तालयातून दर शनिवारी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये साप्ताहिक तक्रार दिन म्हणून सर्वांचे तक्रार निवारण केले जात आहे. Mumbai Police News
मुंबई पोलीस आयुक्तालयांने यांच्या हद्दीत येणाऱ्या मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये दर शनिवारी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जातो. या कार्यक्रमात सर्व पोलीस ठाण्यामधील महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या तक्रार चे निवारण पोलिसांकडून केले जाते. तक्रार निवारण दिनाच्यावेळी सर्व पोलीस ठाणे मिळून 1190 तक्रारदार या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये 549 महिला तक्रारदार आणि 149 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये न्याय मिळेल या अपेक्षा ने एक वातावर आनंदाचे वातावरण होते. पोलिसांचा हा उपक्रम जनतेला न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. मुंबई पोलीस आयुक्त इतर अधिकारी वर्ग यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्व क्षेत्राकडून कौतुक केले Mumbai Police News