Mumbai Lok Sabha Election Live News : लोकसभा निवडणुकीच्या वेळेत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला.
Mumbai Lok Sabha Election Live News : उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनेक नेते आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
मुंबई :- उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत अनेक शिवसेना यूबीटी नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरी शिवसेना पंतप्रधान मोदींसोबत आहे, कारण आमच्याकडे बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा आणि धनुष्यबाण (चिन्ह) आहे. त्यांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडली आणि त्यांना पैशाशिवाय काहीही मिळाले नाही. आवश्यक आहे.” Mumbai Lok Sabha Latest News
उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ.प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Mumbai Lok Sabha Latest News
विश्वासात घेतले जात नसून आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. Mumbai Lok Sabha Latest News
राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने अनेक मंडळी शिवसेनेत येत असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.