OBC Reservation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
OBC Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाला यश, हाके आणि वाघमारे यांचे आंदोलन तूर्तास मागे..
जालना :- आज सरकारचे शिष्ट मंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Lakshman Hake) आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात राज्याचे पाच मंत्रासह बारा जण सहभागी होते.शिष्टमंडळाचे चर्चा करून तूर्तास ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे साथीदार वाघमारे यांना सर्व मागण्या संदर्भात सरकार पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्याने हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. OBC Reservation Latest News
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणी करिता गेले दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. मंत्री धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ,प्रकाश शेडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्री मध्ये दाखल झाले होते. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पेत हाके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. OBC Reservation Latest News
नाव न घेता छगन भुजबळ यांचा इशारा
भुजबळ यावेळी बोलतांना यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. जमाना जानता हैं हम किसीके बाप से नहीं डरते. आपल्याला या दोघांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. लढण्यासाठी दोन्ही वाघ पुन्हा मैदानात पाहिजे आहेत. आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला तुम्ही वेगळे आरक्षण द्या. “, असे भुजबळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले तसेच “बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात आला. त्या कधीही कोणाच्या विरोधात बोलल्या नाहीत. तरीही काहींनी त्यांना विरोध केला. गरिबांना अधिक देण्याचे काम केले पाहिजे. जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. ही लढाई अजून संपलेली नाही. राज्यातील अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले. आपल्यावर अन्याय होतोय, अजून किती सहन करणार असे म्हणत हातात हात धरून बसलात तर काहीही होणार नाही”, असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले आहे. OBC Reservation Latest News