अणुबॉम्बने उडवणार, दिल्ली विमानतळावर स्फोटाची धमकी, पोलीस सतर्क
Delhi Airport : दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्येही विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
ANI :- दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Delhi International Airport (IGI) अणुबॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी (८ एप्रिल) ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, 5 एप्रिल रोजी दिल्लीच्या IGI विमानतळावर विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान दोन प्रवाशांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानतळ अणुबॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. Delhi IGI Airport
विमानतळावर बॉम्बस्फोट Bomb Blast घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितले की त्या दोघांविरुद्ध कलम 182/505 (1)बी अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, या दोन प्रवाशांची नावे अद्याप पोलिसांनी उघड केलेली नाहीत. दिल्ली विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे आणि ते जगातील अनेक प्रमुख शहरांना राजधानीशी जोडते. Delhi IGI Airport