Loksabha Election 2024 : देशातील 21 राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे 102 जागेसाठी आजपासून नामांकित सुरुवात
•महाराष्ट्रातून पहिला अर्ज दाखल, सोलापुरात व्यंकटेश महास्वामी यांनी भरला उमेदवारी अर्ज
मुंबई :- देशातील 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी आजपासून (20 मार्च) नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. Loksabha Election 2024
या 102 जागांमध्ये तामिळनाडूमधील 39, राजस्थानमधील 12 आणि मध्य प्रदेशातील 6 जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. Loksabha Election 2024
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मार्च आहे. तर उमेदवारी अर्जाची छाननी 28 मार्च रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 मार्च ठेवण्यात आली आहे. Loksabha Election 2024
बिहारमधील सणानिमित्त वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. येथे नामांकनाची अंतिम तारीख 28 मार्च निश्चित करण्यात आली आहे. 30 मार्च रोजी छाननी होणार आहे. बिहारमधील उमेदवार 2 एप्रिलपर्यंत आपली नावे मागे घेऊ शकतील.महाराष्ट्रात पहिला अर्ज दाखलः व्यंकटेश्वर महास्वामी नागपूरमध्ये गडकरींविरोधात मैदानात, सोलापुरातून मागितली होती. Loksabha Election 2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. यातच आता नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील हा पहिलाच उमेदवारी अर्ज आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार असे दिसून येत आहे. Loksabha Election 2024
लोकसभा निवडणुका 7 टप्प्यातः पहिले मतदान 19 एप्रिल रोजी, शेवटचे 1 जून रोजी; मणिपूरमधील एका जागेवर 2 टप्प्यात मतदान: 4 जूनला निकाल Loksabha Election 2024