देश-विदेश

Nitin Nabin : युवा नेतृत्वाचा उदय! – भाजपला मिळाला 45 वर्षीय सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; बिहारचे नितीन नबीन यांच्यावर मोठी जबाबदारी

•अमित शहांचा विक्रम मोडीत; संघटनेत मोठी फेरबदल; जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकारपदाचे संकेत; नबीन यांच्याकडे भविष्यातील अध्यक्षपदाची सूत्रे?

नवी दिल्ली :- भारतीय जनता पार्टीच्या (BJP) शीर्ष नेतृत्वात मोठे फेरबदल करत, पक्षाने बिहारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नबीन (Nitin Nabin) यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या घोषणेमुळे 45 वर्षीय नबीन हे भाजपाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी हा विक्रम अमित शहा यांच्या नावावर होता, ज्यांनी 2014 मध्ये वयाच्या 49 व्या वर्षी हे पद स्वीकारले होते.

नितीन नबीन यांच्या नियुक्तीमुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाने संघटनात्मक पुनर्रचनेचा बिगुल फुंकल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षांपासून नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या उत्तराधिकाराबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय वजनदार प्रोफाइल

नितीन नबीन हे बिहारच्या राजकारणातील एक मोठे नाव असून, ते पाटणामधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. त्यांच्याकडे बिहार भाजपचे जनरल सेक्रेटरी, युवा मोर्चाचे प्रमुख आणि सध्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 2012 मध्ये सिक्कीम आणि 2024 मध्ये छत्तीसगड लोकसभा निवडणुकीतही पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी जे.पी. नड्डा यांनाही प्रथम कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांची रीतसर अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे, आता 45 वर्षीय नितीन नबीन यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0