Nitesh Rane : शरद पवार यांची प्रत्येक कृती संशयास्पद, नारायण राणे यांचा गंभीर आरोप
Nitesh Rane On Sharad Pawar : नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे, या वयात पेट्रोल व काडीपेटी घेऊन….
मुंबई :- भाजप खासदार नारायण राणे Nitesh Rane यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘सामना’ वृत्तपत्र दाखवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. नारायण राणे यांनी सुरुवातीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी शरद पवार Sharad Pawar यांच्यावरही निशाणा साधला. “सामना वृत्तपत्रात जी भाषा वापरली जात आहे ती मराठी भाषेची नावलौकिक वाढवणारी आहे? नवीन मराठी शिकणाऱ्यांना मराठी भाषा शिकू नये असं वाटावं, अशी भाषा वापरली जाते? हा माझा प्रश्न आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेट आऊट फ्रॉम इंडिया म्हणणारे कोण आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणारे उद्धव ठाकरे कोण? हा कसा नेता होऊ शकतो? याअगोदर पुण्यातही एक घटना घडली होती, तेव्हा झोपला होतास का? तेव्हा नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करत आहात. एकतर पाय झिजवताय, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, शरद पवार यांच्याकडे मलाच मुख्यमंत्री करा, असं म्हणतात. लाज पण वाटत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी? मी जवळून दृश्य पाहिलं आहे”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. शरद पवार यांची प्रत्येक कृती संशयास्पद असते. या वयात त्यांनी राज्य कसे शांत राहील हे पाहणे आवश्यक आहे. पण ते पेट्रोल व काडीपेटी घेऊनच फिरत आहेत. याउलट उद्धव ठाकरे बावळट माणूस असून ते कोणत्याही कामाचे नाहीत, असे ते म्हणाले.
नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीकाही फेटाळून लावली. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याची लायकी नाही, असे ते म्हणाले. नारायण राणे पुढे म्हणाले, शरद पवार यांची प्रत्येक कृती संशयास्पद असते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे काहीही कामाचे नाहीत. महाविकास आघाडीचे तीनही नेते निकामी आहेत, यांना निवडून देऊ नका. शरद पवारांनी या वयात महाराष्ट्र शांत कसा राहील याकडे बघायला पाहिजे. पण पेट्रोल आणि काडीपेटी घेऊनच फिरत आहेत.
नारायण राणे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे या त्यांच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, कामकाज कळत नव्हते तर मुख्यमंत्री का झाला होतात? उद्धव ठाकरे बावळट माणूस आहे. त्याने आपल्या काळात महाराष्ट्राला 10 वर्षे मागे नेले. आंदोलनात गेट आउट म्हणाले, तुम्हालाच जनतेने मुख्यमंत्री पदावरून गेट आउट केले होते. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. कोरोना काळात देखील मातोश्रीवर पैसे पोहोचायचे, याची चौकशी देखील सुरू आहे.
नारायण राणे यांनी यावेळी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या राड्यावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांना 2 तास बसवून ठेवल्याचा दावा केला. ते म्हणाले, आम्ही आदित्य ठाकरेला 2 तास ताटकळत बसवून ठेवले. हे पाहून जयंत पाटील यांनी आमच्याकडे येऊन वादावर तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा मी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इथून मान खाली घालून जायला जागा करून दिली होती.