मुंबई

Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा…. नितेश राणे यांचा आरोप

Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात असल्याचा आरोप

मुंबई :- शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानाचा झेंडा फडकवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एका व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा झेंडा (Pakistani Flag) दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याचा उल्लेख राणे यांनी केलेला नाही. तसेच या व्हिडिओची सत्यता देखील तपासावी लागणार आहे.

या संदर्भात नीतेश राणे यांनी एका व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशाल याचा उल्लेखही या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याचा उल्लेख मात्र, नीतेश राणे यांनी केलेला नाही. लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासूनच महायुतीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या मुस्लिम समाजाप्रती बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यात आता पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याने या प्ररकणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. Nitesh Rane shared Tweet on Uddhav Thackeray

पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले नीतेश राणे?

या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी एका पोस्टच्या माध्यामतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘UBT च्या मिरवणुकित पाकिस्तान चा झेंडा ! आता काय PFI, SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील… हे दाऊदचे मुंबईत स्मारक पण बांधतील.. आणि म्हणे हा मा. बाळासाहेबांचा “असली संतान”‘

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0