महाराष्ट्र

Nitesh Rane : कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये असं म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी खासदार उदयनराजे भाेसले….आमदार नितेश राणे

Nitesh Rane On Sanjay Raut : स्वतःच ठेवावं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून ही वाईट सवय संजय राऊत ; नितेश राणे

रत्नागिरी :- कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये असं म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या बाबत हीच भूमिका का घेतली नाही? शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात उमेदवार का उभा केला? स्वतःच ठेवावं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून ही वाईट सवय संजय राऊत यांनी सोडून द्यावी. तुम्ही साताऱ्याची जागा सोडा मग आम्ही विचार करू असे आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलताना नमूद केले. Nitesh Rane On Sanjay Raut

राऊत यांच्या भूमिकेवर बाेलताना नितेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज उदयनराजे भाेसले यांच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला आहे हे देखील महाराष्ट्र पाहत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊनच राजकारण केले आणि आजही करताहेत.साता-याच्या गादीचा मान का ठेवला जात नाही? गादी समोर कोणी मोठं नाही. जेवढी कोल्हापूरची गादी महत्वाची आहे. तेवढीच साताऱ्याची ही गादी महत्वाची असे राणेंनी स्पष्ट केले. Nitesh Rane On Sanjay Raut

छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे

कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी आणि भाजपा कोल्हापुरच्या गादीचा अपमान करत आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी मोदींच्या कोल्हापूरमधील सभेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “दलित, शोषित, पीडित यांना जीवनात ताकद देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्या शाहूंचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे ऐकून धक्का बसला नाही, तर आश्चर्य वाटले”, अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0