मुंबई
Trending

Nilesh Lanke : पारनेर भाजप तालुका अध्यक्ष पैसे वाटप करण्याच्या व्हिडिओ निलेश लंकेने केला ट्विट

Nilesh Lanke Shared Video : भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, यांना पैसे वाटप करताना पकडण्याचा व्हिडिओ निलेश लंके यांनी ट्विट

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात Lok Sabha Election महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे. महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली असून पहा विकासाकडे करून निलेश लंके यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या तुतारी या निशाणवर उमेदवारी मिळाली आहे. संपूर्ण प्रचारादरम्यान निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अतिशय जोरदार सामना पाहायला मिळाला होता. आज चौथ्या टप्प्यात मतदान होत असताना निलेश लंके यांनी काल मध्यरात्री भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे हे वडझिरे या गावात पैसे वाटत असताना निलेश लगदा एकदा कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे. त्याचा व्हिडिओ निलेश ला गेले आपल्या ट्विटमध्ये शेअर करत जनतेला प्रश्न उपस्थित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार ठरली देश लंके आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा?
पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा? अहमदनगर मध्ये देशातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून आजच्या मतदानानंतर चार तारखेला अहमदनगर ची जागा कोणाच्या पार्ट्यात जाते हे पाहणे उत्सुकताचे त्याचे ठरले आहे.

आमदार रोहित पवार यांनी बारामती लोकसभेच्या निवडणुकीकरिता Baramati Lok Sabha Election मतदान होताना अनेक व्हिडिओ त्यांनी शेअर करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. काल रात्रीच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत पुन्हा एकदा प्रशासनाला जाब विचारला आहे,बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0