ठाणे

ठाणे शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे — तीन पोलीस निरीक्षकांची बदली

प्रशासकीय कारणास्तव बदलीचे आदेश तत्काळ लागू

मानपाडा, नारपोली आणि शिळ डायघर पोलीस ठाण्यांमध्ये नवे अधिकारी

ठाणे :- पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून ठाणे शहर दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतरत्र पोलीस ठाण्यात झाल्या आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकाची बदली इतरत्र झाली आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय त्रिंबक कादबाने यांची बदली नारपोली पोलीस ठाण्यात झाली आहे.शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान निळकंठराव शिंदे मानपाडा पोलीस ठाण्यात झाली. तर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम बळीराम पौळ यांची बदली शिळ डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुंबई शहरातील जवळपास 13 पोलीस उपायुक्तांची यापूर्वीच बदली करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे पोलीस तंत्रणेत गेल्या काही दिवसांपासून बदलीचे वारे चालू असताना आता उच्च अधिकार्‍याने राज्यातील इतरत्र पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे सत्र चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0