Neeraj Chopra दाखवला जबरदस्त फॉर्म, पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.
Neeraj Chopra : भारतीय संघाचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी उत्कृष्ट फॉर्म दाखवला आणि पावो नूरमी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.
ANI :- गोल्डन बॉय नीरज चोप्राने Neeraj Chopra पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी जबरदस्त फॉर्म दाखवला होता. स्टार भालाफेकपटूने पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्ण जिंकले. फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो फेकला. ऑलिम्पिकपूर्वी आपला फॉर्म चांगला असल्याचे नीरजने दाखवून दिले.
फिनलंडचा टोनी केरानेन या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याने 84.19 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरने 83.96 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले.
नीरजचे सहाही प्रयत्न
- पहिला प्रयत्न 83.62 मीटर
- दुसरा प्रयत्न: 83.45 मीटर
- तिसरा प्रयत्न: 85.97 मीटर
- चौथा प्रयत्न: 82.21 मीटर
- पाचवा प्रयत्न: फाऊल
- सहावा प्रयत्न: 82.97 मीटर.