Navi Mumbai Traffic Update : डीवाय पाटील स्टेडियमवर कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी वाहतूक मार्गात बदल
Navi Mumbai traffic Updates : नवी मुंबई वाहतूक विभागाने 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोल्डप्ले कॉन्सर्टच्या आधी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आल्या आहे
नवी मुंबई :- आंतरराष्ट्रीय कोल्डप्ले कॉन्सर्ट कार्यक्रम नवी मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियम नेरूळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आकर्षक असल्यामुळे मोठ्या संख्येने चाहते नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यादरम्यान नवी मुंबई वाहतूक विभागाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, विशिष्ट मार्ग आणि वाहनांच्या हालचाली आणि पार्किंगवर काही निर्बंधांसह पार्किंग क्षेत्रे नियुक्त केली आहेत.
कार्यक्रमा दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्वांच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना कुठेही पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कार्यक्रमा दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्वांच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना कुठेही पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तशी अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे. ही अधिसूचना जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने , रुग्णवाहिका, शासकीय वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच कार्यक्रम व्यवस्थापनाचे अधिकृत पासधारक वाहने यांना लागू होणार नाही.