नवी मुंबई : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, द ड्रीम स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’
Navi Mumbai Spa Racket : “स्पा” च्या नावाखाली रंगलिला, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश
नवी मुंबई :- रामतनु माऊली बिल्डिंग सेक्टर-1, सानपाडा येथे असलेल्या द ड्रीम स्पा-मसाज Navi Mumbai The Dream Spa सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘सेक्स रॅकेट’ सुरु होते. Navi Mumbai Spa Racket Busted या मसाज सेंटरमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसाठी तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून तीन पीडित तरुणींची सुटका केली.तीन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश प्रमोद पिंगळे, (38 वर्ष) नाजिया बंदेनवाज शेख,(23 वर्ष) आकाश लालसिंग चौहान,(25 वर्ष) हाऊस किपींग द ड्रिम्स स्पा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Navi Mumbai Latest Crime News
अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत द ड्रीम स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहकांच्या मदतीने या सर्व सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. Navi Mumbai Police Busted Sex Racket तसेच या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली चाललेल्या या काळ्याकृत्याचा पर्दाफाश केला आहे. सानपाडा पोलीस ठाण्यात Sanpada Police Station आरोपींच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 1953 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सानपाडा पोलीस ठाणे करत आहे. Navi Mumbai Latest Crime News
महाराष्ट्र मिरार वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून मुंबई शहरातील “स्पा”च्या नावाखाली चाललेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. नवी मुंबईत कारवाई, मुंबईत कधी कारवाई? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई व सहाय्यक पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, महिला पोलीस हवालदार धोनसेकर, अडकमोल, महिला पोलीस नाईक भोये हे सहभागी होते.