Navi Mumbai Police : सीबीडी पोलीस ठाणे कर्मचारी व पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू
Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलीस आयुक्त Navi Mumbai Commissioner यांनी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल व वाहने हे आयुक्त स्तरावर केंद्रित केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन मधील बरीच जागा रिकामी झाली.
तसेच मुद्देमाल ठेवलेल्या काही रूम ही रिकाम्या झाल्या होत्या सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सदर जागेचा कल्पक रित्या उपयोग करून आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम असे उपक्रम सुरू केले होते. त्यानंतर आज त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या रूमचे रूपांतर पोलीस कर्मचारी व पाल्य यांच्याकरिता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले आहे. Navi Mumbai Police Latest News
सदर अभ्यासिकेचे उद्घघाट्न मा. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर अभ्यासकेमध्ये स्पर्धा परीक्षेची, व्यक्तिमत्व विकासाची, कायद्याच्या पुस्तकांसह आत्मचरित्रे, कथा कादंबऱ्या असे एकूण 300ते 350 पुस्तके ठेवण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरा मोहारा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम गिरीधर गोरे यांनी सुरू केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. असेच उपक्रम इतर पोलीस ठाण्यांनीही राबवावेत असे मत मान्य आयुक्त सरांनी व्यक्त केले आहे.सदर वेळी सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 01 पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Navi Mumbai Police Latest News