Mumbra Tadipar News : मुंब्रा पोलिसांची कारवाई ; मनाई आदेशाचा भंग करणारा तडीपार गुंड गजाआड
•तडीपार आरोपीला दीड वर्षाच्या कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते, आरोपीला केले जेरबंद
मुंब्रा :- तडीपारीची कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला मुंब्रा पोलिसांनी जेरबंद केलं आहे.आरोपी शोएब अलीहुसेन शेख (21 वर्ष, रा.कौसा मुंब्रा ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शोएब अलीहुसेन शेख याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्हयाच्या हद्दीतून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1, ठाणे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपआयुक्त,परिमंडळ -1 यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना शहरामध्ये वावर करत होता. त्याला 16 जुन 2024 रोजी दीड वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -1 ठाणे यांची कोणतीही परवानगी न घेता शहरांमध्ये तो राहत असलेल्या नवी वस्ती येथे आला होता. मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी शोएब शेख याला चव्हाण मुंब्रा येथून अटक केली आहे. सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील हे करत आहे.